इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
गेल्या १७ दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ब्रेक लावण्यासाठी राज्याच्या परिवहन विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी पगारवाढ जाहीर केली. मात्र एसटी महामंडळाचे कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर अजूनही ठाम आहेत. त्यामुळे पगारवाढीच्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संप सुरुच राहणार असून इगतपुरी बसस्थानकातून आज एकही बस सुटली नाही. त्यामुळे इगतपुरी बस स्थानकात शुकशुकाट पहायला मिळाला. इगतपुरी आगारातील एसटी चालक व वाहक आजही कामावर आले नसून बहुतांश कर्मचारी हे आझाद मैदानावरील संपात सहभागी झाले असल्याने बस स्थानकातील एसटी बसची चाके अजूनही हलली नाही.