राज्यातील ३१ महिलांना ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार’ जाहीर : मातृसेवा फाउंडेशन ठाणे, सनेज आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांचा अनोखा उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज – मातृसेवा फाउंडेशन ठाणे, सनेज आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार’ ही स्पर्धा घेण्यात आली. ‘शिक्षक ध्येय’चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक, पालक आणि विद्यार्थी वाचक वर्ग आहे. राज्यातील महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर विजेत्या उपक्रमांची निवड केली गेली आहे. महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर आधारित हा उपक्रम जागतिक महिला दिनी राबविण्याचे हे तिसरे वर्ष आहे. राज्यातील ३१ विजेत्या महिलांना सन्मानचिन्ह आणि प्रिंट सन्मानपत्र देण्यात येईल तसेच सर्व सहभागी महिलांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र व्हाट्सअँपवर पाठवण्यात येईल. राज्यातील महिलांनी या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून ३१ महिलांना जागतिक महिला दिनी ‘कर्तृत्ववान महिला’ म्हणून पुरस्कार देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे. राज्यातील उपक्रमशील, कर्तृत्ववान महिलांनी या स्पर्धेत उत्फुर्तपणे सहभाग नोंदवत ही स्पर्धा यशस्वी केली. सर्व विजेत्यांचे मातृसेवा फाउंडेशनच्या संध्या सावंत, सनेजच्या प्राइम क्लबच्या संचालक मिनल कुलकर्णी, पुणे; शिक्षक ध्येयचे संपादक मधुकर घायदार; कार्यकारी संपादक प्रभाकर कोळसे, कविता चौधरी, भाग्यश्री पवार, श्रद्धा पवार जळगांव; वसुधा नाईक, पुणे, डी. जी. पाटील, विजय अहिरे, पुरुषोत्तम पटेल, नंदुरबार; संजय पवार, रायगड; कैलास बडगुजर, ठाणे, डॉ. माधव गावित, राजेंद्र लोखंडे, सतिश बनसोडे नाशिक; प्रेमजीत गतीगंते, मुंबई; अशरफ आंजरलेकर, रत्नागिरी; एस. जी. कांबळे, लातूर; मिलिंद दिक्षित वर्धा, अर्चना भरकाडे, यवतमाळ आणि शिक्षक ध्येय परिवार यांनी अभिनंदन केले आहे.

राज्यातील कर्तृत्ववान महिला पुरस्कार प्राप्त महिलांमध्ये माधुरी पैठणकर, अहमदनगर, मंजू वानखडे (सौ. वणवे) अमरावती, नूतन नितीन कांबळे, रत्नागिरी, संगिता तुळशीराम पवार, मुंबई, ले. डॉ. शितल चोपडे जावळे, नागपूर, डॉ. वैशाली शांताराम शिंदे, नंदुरबार, रंजना सुपडू कोळी इंगळे, जळगाव, कला गिरीश बारीआ, ठाणे, ताई सूरेश लांडे, धाराशिव, वर्षा प्रवीण गवारले, वर्धा, अर्चना ज्ञानदेव गाडगे, नाशिक, अंजली विजयराव कडू, अमरावती, ज्योती दत्तात्रय भोये, मुंबई, निर्मले सुनंदा मधुकर, धाराशिव, दिपाली सतिश सावंत, वर्धा, मानसी मनोज खाडे, रायगड, कासार स्वाती संपत, अहमदनगर, आल्फिया महंमद बागवान, कोल्हापूर, भारती दिलीप सावंत, नवी मुंबई, राठोड वर्षा मेघराज, लातूर, दिपाली प्रफुल्ल पाटील, कोल्हापूर, मुक्ता पंजाबराव आपोतीकर, छ. संभाजीनगर, कविता संदीप चोथवे, अहमदनगर, भारती युवराज मराठे, नंदुरबार, श्वेता सचिन फडके, ठाणे, स्वाती आप्पासाहेब शेटे, रायगड, रेखा आप्पासाहेब नाईक, कोल्हापूर, शितल दिनकर भालेकर, नांदेड, निलांबरी सदन उप्पलवार, वर्धा, कविता अर्जुन कुमावत, छ. संभाजीनगर, सोनाली मनोहरराव ठावरी, वर्धा यांचा समावेश आहे.

Similar Posts

error: Content is protected !!