संदीप कोतकर : इगतपुरीनामा न्यूज – प्रत्येकाने आपल्या जीवनाचे ध्येय ठरवणे फार गरजेचे आहे. जीवनात स्पष्टता असणे महत्त्वाचे असून देशभक्ती वृद्धिंगत होऊन देशभक्त तयार झाले पाहिजे. लोकप्रतिनिधी लोकांसाठी उपलब्ध नसेल तर त्याला संविधानिक पद्धतीने हाणून पाडले पाहिजे. आपण सर्वांनी लोकशाहीचे शिल्पकार व्हा असे आव्हान ‘जागृत नाशिक जागृत भारत ‘अभियानाचे प्रवर्तक स्वामी श्री कंठानंद यांनी केले. श्री स्वामी समर्थ मंडळ व श्री जनसेवा प्रतिष्ठान, इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव आणि स्वामी गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपास्थित विद्यार्थी व नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी उपस्थित होते. कर्तृत्ववान अधिकारी पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, आदर्श पत्रकार पोपट कारभारी गवांदे, शैलेश शामसुंदर पुरोहित, विकास भास्कर काजळे, आदर्श शिक्षक विजय शंकर पगारे, निवृत्ती सखाराम तळपाडे, एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक भगवान रामा मधे, आनंद मधुकर बर्वे, निता सुरेश वारघडे, तुकाराम सखाराम वारघडे, ॲड. प्रेमसुख रामचंद्र चांडक, अनंत महादेव पासलकर, योगेश संजय चांदवडकर, सत्तार इस्माईल मणियार, डॉ. नरेंद्र दिपचंद सेठी, नंदकुमार विठ्ठल भोंडवे, उपक्रमशील आदर्श शाळा लिटल ब्लॉसम स्कूल, हरिष चव्हाण यांना श्री स्वामी गौरव पुरस्कार २०२३ देऊन गौरव करण्यात आला.
मनपाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव, महसूल चिटणीस परमेश्वर कासुळे, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, मुख्याधिकारी पंकज गोसावी, घोमकोचे अध्यक्ष दिपक चोरडीया, घाटनदेवी ट्रस्टचे ताराचंद भरींडवाल, माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष बन्सीलाल चांडक, घन:श्याम रावत उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय चौधरी यांनी मंडळाचे कौतुक करून २४ वर्षांपासून सुरू असलेला उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आशादायी असल्याचे सांगीतले. यावेळी गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. गुणवंत विद्यार्थी आणि घोटी मर्चंट बँकेच्या नवनिर्वाचित सर्व संचालकांचा सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना स्वामी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी घोटी मर्चंट बँक, डॉ. हेडगेवार पतसंस्था, रावत फांउडेशन, श्री माहेश्वरी बालाजी मंदिर ट्रस्ट, झेड. आर. नावंदर चॅरीटी ट्रस्ट, कै. अनिल – सुनिल खंडेलवाल ( रावत) चॅरीटेबल ट्रस्ट, घोटी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर लहाने यांनी मोलाचे सहकार्य केले. जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण फलटणकर, सदस्य रामानंद बर्वे, गजानन गोफणे, अजित पारख, प्रकाश नावंदर, सुनिल आहेर, दिनेश लुणावत, प्रसाद चौधरी, जालिंदर मानवडे, महेश मुळीक, संदीप कोतकर, आकाश खारके, राजेश जैन, सुधीर कांबळे, शैलेश शर्मा, पुनित चांडक, बबन कदम, पुरणचंद लुणावत, संजय बांठिया, सुरेंद्र गायकवाड, संतोष चव्हाण, संदिप पंडित, माणिक भरिंडवाल, प्रशांत गुजराथी, योगेश हाके, कैलास गुजराथी, श्रीकांत गुजराथी आदींनी सोहळ्यासाठी परिश्रम घेतले.