
इगतपुरीनामा न्यूज – महत्वाची बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातील जनता व कन्या शाळेबाहेर व परिसरात टवाळखोरांकडून शालेय मुलीची छेड काढली जात आहे. या टवाळखोरांचा बंदोबस्त करून त्यांच्या मुसक्या आवळाव्यात या मागणीसाठी भाजयुमोचे तालुकाध्यक्ष रवी गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, या दोन्ही शाळा सुटल्यावर टवाळखोर व रोडरोमिओ मुलीची छेड काढत असुन मुलीचे हात धरणे, कपडे ओडणे, अश्लील भाषा वापरणे असे प्रकार घडत आहेत. घोटी बसस्थानकात हे टवाळखोर मुली व महिलांसमोर स्टंटबाजी करून छेड काढत आहेत. याबाबत शाळेतील शिक्षकांनी यांना जाब विचारला असता त्यांना मारहाण केली जात आहे. तर अनेक पालकांनी या रोडरोमिओना हटकले तर त्यांनाही मारहाण झाल्याने महिला, मुली, शिक्षक व पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपण या प्रकरणात लक्ष घालुन या टवाळखोर रोडरोमिओ यांचा बंदोबस्त करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रवि गव्हाणे, ॲड. सुशिल गायकर, तानाजी रुमणे, प्रकाश तोकडे आदी उपस्थित होते.