इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील तळेगाव जवळ असलेल्या सर्विस रोडवर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन जणांच्या टोळक्याने कंपनी कामगाराच्या गळ्याला चाकु लावुन लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर इगतपुरी पोलीस ठाण्यात नांदगावसदो येथील तीन संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहीत अशी की, गणेश दत्तात्रय मराडे, वय २३ वर्ष, रा. तळेगाव लालवाडी तहा युवक गोंदे दुमाला येथे कंपनीत कामाला आहे. कंपनीतुन रात्री १२ वाजता तळेगाव येथे मोटार सायकलने घरी निघाला होता. मध्यरात्री पावने एक वाजेच्या सुमारास तळेगाव येथील सर्विस रोडवर टर्न मारला असता या रोडवर पुरुशोत्तम गिरी उर्फ गंगा, नागेष भागडे उर्फ चिमण्या, तुषार भागडे रा. नांदगाव सदो हे तीन तरुण मोटार सायकल रस्त्यात आडवी लावुन उभे होते. गणेश मराडे याला पाहताच त्यांनी त्याच्या गळ्याला चाकु लावत धमकावत त्याच्या खिशातील रोख ४५०० रुपयांसह मोबाइल, गळ्यातील चांदीची चैन, ब्लुटुथ, घड्याळ असा एकुण २३ हजार ७०० रुपये किंमतीचा ऐवज बळजबरीने काढुन घेतला. याबाबत गणेश मराडे यांच्या फिर्यादीवरून नांंदगाव सदो येथील पुरुशोत्तम गिरी उर्फ गंगा, नागेष भागडे उर्फ चिमण्या, तुशार भागडे या संशयितां विरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उप निरीक्षक संदीप शिंदे यासह पोलीस पथक करीत आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group