सेवापुर्ती निमित्त ६ मुख्याध्यापकांचा शिक्षक संघाच्या वतीने सन्मान

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात शिक्षण क्षेत्रातील अमूल्य अशी सेवा करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या ६ मुख्याध्यापकांचा सेवापूर्ती सोहळा गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने तालुक्यातील कुरुंगवाडी शाळेचे आदर्श मुख्याध्यापक आप्पा शिवराम जाधव, काळुस्ते शाळेचे मुख्याध्यापक मधुकर महाले, नांदगाव सदो शाळेचे मुख्याध्यापक सतीश सोनवणे, निरपण शाळेचे मुख्याध्यापक शरद सांगळे, वडाचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक महेश मोरे व पिंपरी सदो शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा ढोले या सहा मुख्याध्यापकांचा शिक्षक संघाचे तालुका नेते उमेश बैरागी, तालुकाध्यक्ष निवृत्ती नाठे, तालुका सरचिटणीस भीला अहिरे, विनायक पानसरे दीपक भदाणे दीपक पगार कैलास सूर्यवंशी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी निवृत्त गटशिक्षणाधिकारी माधव पाटील, मनोहर वाघमारे साहेब , विस्ताराधिकारी सांगळे, अशोक मुंढे, नेरे, सर्व केंद्रप्रमुख व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!