इगतपुरीनामा न्यूज – घोटी बाजार समिती निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे १६ उमेदवार विजयी झाले. यानिमित्ताने पाडळी देशमुख विविध कार्यकारी सोसायटी व ग्रामपंचायतीतर्फ नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके आदींनी मनोगत व्यक्त केले. निवृत्ती जाधव, ज्ञानेश्वर लहाने, सुनील जाधव, शिवाजी शिरसाठ, हरिदास लोहकरे, अर्जुन पोरजे, रमेश सदाशिव जाधव, भाऊसाहेब कडभाने, सुनीता गुळवे, आशा खातळे, राजाराम धोंगडे, अर्जुन भोर, संपत वाजे, भरत आरोटे, नंदलाल पिचा, रमेश खंडू जाधव यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मविप्रचे माजी संचालक भाऊसाहेब खातळे, खरेदी विक्री संघाचे व्हॉइस चेअरमन जयराम धांडे, सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळू आमले, बाळासाहेब गणपत धांडे, चेअरमन विष्णू धोंगडे, संचालक कृष्णा चौधरी, कचरू गवारी, तानाजी धांडे, माजी चेअरमन रामभाऊ धांडे, कचरू पाटील शिंदे, गटसचिव संघटनेचे देविदास नाठे, ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद धांडे, फकिरराव धांडे, बजरंग वारुंगसे, कैलास धांडे, दिनेश धोंगडे, उत्तम फोकणे, रवी घाटेसाव, रामचंद्र धोंगडे, नरेंद्र धांडे, अनिल धांडे, नामदेव चौधरी, रतन धांडे, किरण धांडे, भानुदास धांडे, भास्कर धांडे, सुभाष फोकणे, लखन धांडे, कारभारी नाठे, पोपटराव धांडे, रतन धांडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group