
इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – इगतपुरी तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या चेअरमनपदी बाळासाहेब वालझाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. व्हॉइस चेअरमनपदावर अनिल भोपे यांना बिनविरोध संधी मिळाली आहे. ११ संचालक असणाऱ्या ह्या संस्थेची निवडणूक सुद्धा बिनविरोध झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी तथा इगतपुरीच्या सहकारी संस्था सहाय्यक निबंधक अर्चना सैंदाणे यांनी निवडीची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. इगतपुरी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
नूतन चेअरमन बाळासाहेब वालझाडे यांनी यापूर्वी ह्या संस्थेवर चेअरमन म्हणून काम पाहिलेले असून त्यांना कामाचा दीर्घ अनुभव आहे. इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही वर्षांपूर्वी काम केलेले आहे. नवे व्हॉइस चेअरमन अनिल भोपे हे टिटोली गावाचे सरपंच म्हणून काम पाहत असून ते आगरी समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सभासदांचे आणि तालुक्याचे हित साधले जाणार आहे. निवडीच्या बैठकीवेळी संस्थेचे संचालक इगतपुरीनामाचे संपादक पत्रकार भास्कर सोनवणे, भगीरथ भगत, ज्ञानेश्वर लहामगे, शिवाजी शिंदे, सुनिता क्षिरसागर, माया किर्वे, राजेंद्र बागुल, लहु तोकडे, सोमनाथ क्षिरसागर उपस्थित होते. निवडीनंतर माजी आमदार शिवराम झोले, निर्मला गावित जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, सुनील जाधव, शिंदे गट शिवसेना उपजिल्हाप्रमुख रघुनाथ तोकडे, मनसे जिल्हा नेते संदीप किर्वे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस भास्कर गुंजाळ, ठाकरे गट शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडॊळे, नंदलाल भागडे, आगरी नेते अरुण भागडे, प्रशांत कडू, धर्मा दुभाषे, भानुदास आडोळे आदींनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. सचिव शरद उबाळे यांनी निवडीच्या कार्यक्रमाला सहकार्य केले.