इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ – वर्षानुवर्षे विकासाच्या फळांपासून कोसो दूर असणाऱ्या मोडाळे आणि परिसरातील गावांचा चेहरामोहरा बदलला आहे. जगाला दखल घ्यायला लावणारी कामगिरी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके हे ग्रामस्थांसह अग्रेसर आहेत. ह्या सर्वांच्या खांद्याला खांदा लावून आम्हीही नेहमीच सोबत आहोत. मोडाळे, शिरसाठे गावांसाठी आगामी काळात गोरख बोडके यांच्या माध्यमातून विकासासाठी कायमच तत्पर राहू असे प्रतिपादन सॅमसोनाईट आणि बॅगझोन कंपनीचे मालक तैनवाला साहेब यांनी केले. मोडाळे, शिरसाठे गावात त्यांनी स्वतः भेट देऊन गावांच्या विकासाची पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. भविष्यात ह्या गावांच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करू असेही ते म्हणाले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी श्री. तैनवाला यांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत केले. ह्या अतिदुर्गम गावांसाठी तैनवाला यांनी यापूर्वी सुद्धा साहाय्य केल्याने त्यांचे गावकऱ्यांनी ऋण व्यक्त केले. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, सोसायटी चेअरमन, व्हॉइस चेअरमन, संचालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group