कवयित्री : कु. सोनाली कोसे, डोंगरगाव
ता. नागभिड, जि. चंद्रपूर
संपर्क : 9322482768
नकळत झालेली अविश्वसनीय भेट
त्यातचं जुळली नाती ऋणानुबंधाची
नकोसा वाटणाराही होऊनीच गेला
अनुभवले क्षण आता मीही प्रेमाची
दोघेही एकमेकांना समजून घेऊन
आपणच बनलो एकमेकांचा आधार
तऱ्हेतऱ्हेचे विचार समोर मांडूनी
केली प्रीत तुझी नि माझी साकार
कोवळ्या कळीतून उमललं एक
टवटवीत फुल फक्त माझ्यासाठी
बहरली सुशोभित वनराई सुगंधाने
तशीच मी फुलराणी तुझ्यासाठी
हातात हात घट्ट तुझा माझा
नजरेतही झुरते प्रेमाची नशा
बेचैन मन मिठीत तुझ्या चित्त
नकोत व्हावया एकांताच्या दशा
गोडवा नात्यात अधिकच वाढला
तुझ्यासारखा प्रियकर सर्वांना लाभावा
मुलींबद्दल नेहमीच आदर, सन्मान
सदोदित मला तुझाच सहारा असावा
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
साथ तुझी आजीवन असू दे
संकटकाळी आधार एकमेकांचा
अशीच प्रीत तुझी माझी फुलू दे