इगतपुरीनामा न्यूज, दि. 11
इगतपुरी तालुक्यातील भाम धरणामुळे बाधित झालेल्या दरेवाडीच्या ४० कुटुंबासाठी पहिली ते पाचवी सुरू असलेली शाळा बंद करून वाडीतील 43 मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले आहे.भाम प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या दरेवाडीच्या ४० कुटुंबासाठी धरणाजवळ तात्पुरते निवारा शेड असलेल्या ठिकाणी शाळा सुरू होती. परंतु ऑगस्टमध्ये ही शाळा बंद करुन मुलांच्या शिक्षणाचे भविष्य उध्वस्त करण्याचा प्रशासनाने प्रयत्न सुरू केला आहे. या ठिकाणी भरणारी शाळा तात्काळ इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी 13 सप्टेंबरपासून बंद केली आहे. तेव्हापासून हे सर्व विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून शाळा बंद असल्याने मुलांना शिक्षणा पासून वंचित ठेवले आहे. म्हणून आपणाकडे सर्व विद्यार्थ्यांना घेऊन दप्तर घ्या बकऱ्या द्या ह्या मागणीचे निवेदन नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशीमा मित्तल यांना देण्यात येणार आहे.
दरेवाडी येथील तात्काळ शाळा सुरू करावी, मुलाना एक महिन्यापासून शिक्षणापासून वंचित ठेवणारे इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, केंद्रप्रमुख माधव उगले आदी संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी, नवीन शाळेला तात्काळ मंजुरी देण्यात यावी ह्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात येत आहेत. सीताराम गांवडा यांच्या नेतृत्वाखाली गणपत गावंडा, साईनाथ गावंडा, सोमनाथ आगिवले, बाळू गावंडे, काळू गांवडा, लक्ष्मण गावंडे, लहू गावंडे, कृष्णा गावंडे, आनंद आगीवले, राजेंद्र मेंगाळ, गोविंद गावंडे, यशोदाबाई गावंडे, नथु सावंत, मथुरा भगत उपस्थित आहेत. आज सकाळी दरेवाडी येथून 43 विद्यार्थी दप्तर जमा करण्यासाठी नाशिकला आले आहेत. दप्तर जमा करून आम्हाला शेळ्या द्याव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.