इगतपुरीनामा न्यूज, दि. 25
आपली पितरे अर्थात पूर्वजांची कृतज्ञता आणि आराधना करण्यासाठी पितृपक्षात त्यांना भोजन देण्याची सर्वत्र पद्धत आहे. काळानुरूप त्यामध्ये बदल होऊन अनेक पायंडे पडले आहेत. त्यानुसार पितृऋणातुन मुक्त होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी स्तुत्य काम केले आहे. त्यांचे वडील स्व. देवराम बोडके यांच्या पितृदिनाच्या निमित्ताने मोडाळे येथील जिल्हा परिषद शाळेला स्वखर्चाने 50 हजार किमतीचे पिण्याचे पाण्याचे वॉटरकुलर आणि फिल्टर भेट देण्यात आले. पितृपक्षात ह्या उपक्रमानिमित्त गोरख बोडके यांच्या उपयुक्त उपक्रमाचे कौतुक करण्यात आले असून धन्य मातापिता तयाचिया अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
पाण्यामुळेच विविध आजार उद्भवत असतात. त्यामुळे ह्याच्या परिणाम आरोग्यावर होऊन शैक्षणिक नुकसान होते. या पार्श्वभूमीवर पितरांचे स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठो जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके हा उपक्रम स्वखर्चाने केला. यामुळे शाळेतील मुलाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. पितृपक्षात अनोख्या मार्गाने पूर्वजांच्या आठवणीचे निमित्त विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरले आहे. यानिमित्ताने ह्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. धन्य मातापिता तयाचिया असे कौतुक मोडाळे ग्रामस्थांनी केले आहे.