इगतपुरीनामा न्यूज, दि. 25
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीकोनातून सकस आहारआणि परिपूर्ण पोषण कसे करावे ह्यासाठी घोटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नं. २ येथे रानभाज्या महोत्सव आयोजित केला होता. मुलांना पालकांना सकस आहार कोणता द्यावा, कोणते पदार्थ दिले म्हणजे प्रथिने, जीवनसत्व, पिष्टमय पदार्थ मिळतात. यासोबतच स्वच्छतेचे महत्व व आरोग्याची घ्यावयाची काळजी याबाबत मुख्याध्यापक पोपट खाडगीर यांनी विद्यार्थी पालकांना महत्व समजावून सांगितले.
ज्येष्ठ शिक्षिका मनीषा वाणी यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी मुख्याध्यापक पोपट खाडगीर, अशोक भांगे, ज्योती चित्ते, शीला गातवे, सविता गायधनी, अनिता गोसावी आदींनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा संगीता वालझाडे, यांसह माता-पालक समिती सदस्या पालकवर्ग यांनी सहकार्य करून उपस्थिती दर्शवली.