वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व यांचा त्रिवेणीसंगम असणारे गोरख बोडके यांचा “लोकमत Political Icons 2022” पुरस्काराने सन्मान : विधानसभा अध्यक्ष ना. नरहरी झिरवळ आदींच्या हस्ते पुरस्कार वितरण संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या तीन मूल्यांचा त्रिवेणीसंगम साधून लोकप्रतिनिधी म्हणून अव्वल कामगिरी करणारे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांना आज “लोकमत Political Icons 2022” ह्या पुरस्काराने गौरवण्यात आले. विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष ना. नरहरी झिरवळ आदी मान्यवरांनी गोरख बोडके यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे सारख्या छोट्या खेड्याला देशाच्या नकाशावर झळकवून तालुक्याच्या सर्व भागात विकासाची खरी व्याख्या गोरख बोडके यांनी सिद्ध करून दाखवली आहे. ह्या पुरस्काराचा सन्मान गोरख बोडके यांच्यामुळे अधिकाधिक वाढला असल्याचे इगतपुरी तालुक्यात व्यक्त होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

नाशिक येथील हॉटेल एक्सप्रेस इन येथील रॉयल हॉलमध्ये संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात विधानसभा अध्यक्ष ना. नरहरी झिरवळ, लोकमतचे व्यवस्थापक बी. बी. चांडक, नाशिक आवृत्तीचे संपादक मिलिंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी क्षमतेपेक्षा पुढे जाऊन आपले गाव आणि संपूर्ण तालुक्यात विविध विकासाची कामे केली आहे. कोट्यावधी रुपयांची कामे करून ते अखंडितपणे लोकांच्या सेवेत रुजू असल्याबाबत त्यांना “लोकमत” तर्फे मानाचा पुरस्कार देण्यात आला. श्री. बोडके यांचे सर्वत्र अभिनंदन सुरु आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!