उपसरपंच आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने रेशन दुकानातील धान्य काळ्या बाजारात नेतांना पकडले : इगतपुरी तालुक्यातील घटना ; प्रशासनाकडून कार्यवाही सुरु

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०

इगतपुरी तालुक्यातील गडगडसांगवी येथील स्वस्त धान्य दुकानात वाटप करून शिल्लक राहिलेल्या धान्याचे 32 कट्टे काळ्या बाजारात विक्रीसाठी चालले असतांना ग्रामस्थांनी सतर्कतेने मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. स्वस्त धान्य दुकान नं १११ चे दुकानदार यांनी अर्धवट धान्य वाटप करून उरलेले धान्य आज धान्याने भरलेले पोते रिकामे करून प्लास्टिक गोणीत भले. उरलेला माल वाटप न करता काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन चालले असता ग्रामस्थांनी ते स्वतः पकडले. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दखल घेऊन पुरवठा विभागाचे पथक घटनास्थळी पाठवले आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी दखल घेतली आहे. मुरंबी गडगडसांगवी ग्रामपंचायतीचे उपसरपंच रतन शिंदे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बेंडकुळी, माजी पोलीस पाटील दत्तु पुंजाजी शिंदे, दिलीप शिंदे, खंडू बेंडकोळी, सुकदेव शिंदे, नथु भोई, समाधान भोई, बालाजी तळपाडे, पंडीत शिंदे, नवनाथ शिंदे, प्रभाकर शिंदे, संदीप शिंदे, काळु वाघ, हनुमंता वाघ, गजीराम बेंडकुळी,अशोक शैडे, रामदास पाटील शिंदे, मंगलाबाई पाडेकरं, चंदाबाई बेंडकोळी, ठकुबाई पुरकुले, हिराबाई पाडेकर, सुन्याबाई पाडेकर, चंदाबाई मोर आदी ग्रामस्थांनी ही मोहीम फत्ते करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत तहसील अधिकाऱ्यांकडून पुढील कार्यवाही सुरु झाली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!