सांजेगाव नांदडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विठ्ठल खातळे बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव नांदडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेना शाखाप्रमुख विठ्ठल खातळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच निता शंकर गोवर्धने यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष सभा घेण्यात आली. सदस्यांत ठरलेल्या समझोत्याप्रमाणे विद्यमान उपसरपंच यांचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांनी स्वखुशीने राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त पदासाठी विठ्ठल खातळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच निता शंकर गोवर्धने, ग्रामसेवक पाटील यांनी केली.

सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सांजेगाव नांदडगाव दोन्ही गावातील जेष्ठ नागरिकांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणारी विकासकामे, प्रलंबित कामे गावातील रस्ते ,पाणी योजना, स्वच्छता, गटार योजना ही कामे अग्रकमाने हाती घेऊन स्वच्छ गाव व सुंदर गाव करण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करेल.
- विठ्ठल गहिनीनाथ खातळे, नूतन उपसरपंच

ग्रामपंचायत सदस्य मुक्ताबाई गोवर्धने, सिंधूबाई काळे, मंगेश शिंदे, इंदुबाई गोवर्धने, मच्छिंद्र गोवर्धने, तानाजी सोनवणे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सदस्य आणि ग्रामस्थांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन विठ्ठल खातळे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी केरू गोवर्धने, शंकर गोवर्धने, खंडू गोवर्धने, नंदू गोवर्धने, ज्ञानेश्वर खातळे, भाऊसाहेब खातळे, दशरथ खातळे, रामदास खातळे, संपत खातळे, योगेश खातळे, दौलत खातळे, पुंजा खातळे, दिनकर खातळे, सचिन  खातळे, सागर खातळे, खंडू खातळे, सागर केरू खातळे, रामदास गोवर्धने, नंदू गोवर्धने, विजय गोवर्धने, कैलास गोवर्धने आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!