ब्रेकिंग न्यूज : एक तारखेपासून राज्यातल्या सर्व शाळा सुरू होणार!

इगतपुरीनामा न्यूज दि. २५ : कोविड महामारीमुळे बंद असलेल्या राज्यातील प्राथमिक शाळांची घंटा तब्बल दीड वर्षानंतर वाजणार आहे. एक डिसेंबर पासून राज्यातील सर्व शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचे पालक, विद्यार्थी शिक्षक या सर्वांकडून स्वागत केले जात आहे. दिवाळीपूर्वी राज्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये पाचवीपासून तर शहरी भागातील शाळांमध्ये आठवी पासून […]

ब्रेकिंग न्यूज : पहिलीपासून शाळा सुरू होणार!

इगतपुरीनामा न्यूज दि. १७ : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा आता काही अंशी उघडल्या असल्या तरी अजूनही शाळा पूर्णपणे अनलॉक झालेल्या नाहीत. सद्यस्थितीमध्ये राज्याच्या ग्रामीण भागात पाचवीपासून चे वर्ग आणि शहरी भागात आठवी पासून चे वर्ग सुरू आहेत. मात्र आता लवकरच पहिलीपासून वर्ग सुरू होण्याचे संकेत मिळत असून मुख्यमंत्री महोदय यांनी मान्यता दिली तर लवकरच राज्यातील […]

कोविड काळात विधवा झालेल्या महिलांसाठी ‘वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना’ : ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २ कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानजनक उपजीविका करता यावी, यासाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन अशा महिलांसाठी वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून आज या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य […]

दिवाळी सुट्टीचा कालावधी पूर्ववत करण्याची आमदार कपिल पाटील यांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज दि. २८ : दिवाळी सणासाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक (उत्तर पश्चिम, दक्षिण) कार्यालयाने १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर पर्यंत सुट्टी कालावधी जाहिर केला होता. त्यानुसार शाळांमध्ये परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना सुट्टी कालावधीची सूचना देण्यात आली आहे. ३० ऑक्टोंबर पर्यंत सत्र परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र काल अचानक या नियोजनात बदल करण्यात […]

इगतपुरी पाणीपुरवठा केंद्राच्या दुरुस्तीस मान्यता – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील

इगतपुरीनामा न्यूज, दि.१७ इगतपुरी पाणीपुरवठा केंद्राच्या दुरुस्तीस पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज  मंत्रालयात झालेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पाणीपुरवठा केंद्रास 1988 मध्ये  योजना कार्यान्वित झाल्यापासून आजतागायत मोठ्या स्वरूपाची कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती .या पार्श्‍वभूमीवर योजनेच्या दुरुस्तीसाठी सुमारे 41 लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र जीवन […]

पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतच्या कर्जासाठी आता 0 टक्के व्याज

इगतपुरीनामा न्यूज, दि. १० पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 0 टक्के दराने व्याज आकारणी केली जाईल. एक लाख ते तीन लाखांच्या कर्ज मर्यादेत विहीत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सध्याच्या एक टक्के व्याजदरात आणखी दोन टक्के व्याज दर सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री […]

कोविड संसर्गामुळे आई वडिलांच्या मृत्यूने अनाथ झालेल्या बालकांचे पालकत्व स्वीकारण्यास शासन खंबीर – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

नवीन योजना मंत्रिमंडळाने केली मंजूर ; अनाथ बालकांच्या नावे ठेवली जाणार ५ लाख रुपयांची ठेव इगतपुरीनामा न्यूज, दि. २कोविड -19 मुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे काही बालकांच्या आई आणि वडील अशा दोनही पालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या अनाथ झालेल्या बालकांना दिलासा देण्याविषयी आम्ही विचार करत होतो. त्यानुसार अशा बालकांचे पालकत्व स्वीकारण्यास राज्य […]

कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना घोषित – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

प्रत्येक महसुली विभागात पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस इगतपुरीनामा न्यूज, दि. २ : राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास […]

error: Content is protected !!