नाशिकरोड ते इगतपुरी दरम्यान रेल्वेतून युवक बेपत्ता : इगतपुरी रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

हावडा ते मुंबई असा रेल्वे प्रवास करत असताना नाशिक रोड ते इगतपुरी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे गाडीतून युवक बेपत्ता झाल्याबाबत इगतपुरी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या युवकाबाबत कोणालाही काही माहिती असल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आरिफ फुल शेख वय 21  रा. नुरगोनोबी गोविंदपुर, प. बंगाल हा युवक हावडा मेल 12810 गाडीच्या बोगी नंबर एस 3 बोगीत प  बंगाल ते मुंबई करीता प्रवास करीत होता. गाडी नाशिकरोड रेल्वे स्थानकातून सुटल्याच्या अगोदर तो प्लॅटफॉर्मवर चहापाण्यासाठी उतरला  नंतर तो गाडीत बसला. हा युवक नाशिकरोड रेल्वे स्थानकातुन गाडी सुटल्यानंतर नाशिकरोड ते इगतपुरी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेच्या चालत्या गाडीतून बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार आई नोहिदा बिबी शेख यांनी इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंदवली. या युवकाबाबत कोणाला काही माहिती असल्यास तात्काळ इगतपुरी लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधावा अथवा युवकाच्या नातेवाईकांशी 9324054394, 6297090644, 7506250963 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन इगतपुरी लोहमार्ग पोलिसांनी केले आहे

Leave a Reply

error: Content is protected !!