सुभाष कंकरेज : इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
सेवकांची सेवा हीच राष्ट्र भक्ती हे ब्रीदवाक्य घेऊन कार्य करणारी शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांची नोंदणीकृत नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशन, नाशिक ही संघटना ओळखली जाते. १७ डिसेंबर पेन्शनर्स एकात्मता दिन आणि जागतिक पेन्शनर्स दिनाचे औचित्य साधून संघटनेने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. उद्या शुक्रवारी १७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता संघटनेकडून पेन्शनर्स एकात्मता दिन साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त विविध मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
ह्या कार्यक्रमात नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशनचे माजी अध्यक्ष स्व. माधवराव भणगे, नाशिक जिल्हा परिषदेचे निवृत्त स्थापत्य अभियंता स्व. गमनराव देवरे यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मान्यवरांचा "कर्मचारी भूषण प्रेरणा" पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्कार्थींमध्ये महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीक वर्गीय संघटनेचे राज्य सचिव बापूसाहेब कुलकर्णी, नाशिक जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भामरे, धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास गांगुर्डे, सिंचन कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष पी. एस. देव्हारे ( काका ), नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा पुजाताई पवार, नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रापं ) रवींद्र परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, इगतपुरीनामाचे मुख्य संपादक भास्करराव सोनवणे, सोमनाथ सहाणे, सुनिल माधवराव भणगे, आशिष गमनराव देवरे यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमनेरच्या नगराध्यक्षा श्रीमती दुर्गाताई सुधीर तांबे असणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे, नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( साप्र ) आनंदराव पिंगळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना नाशिकचे अध्यक्ष दिलीप थेटे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम उद्या शुक्रवारी १७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता ग्रामसेवक भवन, गंगोत्री गॅरेजच्या मागे, बाजीराव नगर, तिडके कॉलनी, नाशिक येथे होणार आहे. कोरोना नियमांचे पालन करून कार्यक्रम संपन्न होणार असून ह्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशनचे अध्यक्ष उत्तमराव ( बाबा ) गांगुर्डे, उपाध्यक्ष रविंद्र ( बापू ) थेटे, सरचिटणीस मधुकर कांगणे, कोषाध्यक्ष अशोक मानकर यांनी केले आहे. कार्यक्रमासाठी प्रसिध्दी प्रमुख सुभाष कंकरेज ( नाना ), महिला संघटक प्रमुख पुजाताई पवार आणि सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.