रेशन दुकानदार संघटनेतर्फे मयत दुकानदारांच्या वारसांना आर्थिक सहाय्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. 8
कोरोना संसर्गाच्या काळात इगतपुरी तालुक्यातील काही रेशन दुकानदारांचा कोरोनामुळे मृत्यु झाला. अद्याप शासनाने जाहीर केलेली मदत त्यांच्या वारसांना मिळालेली नाही. म्हणून रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने स्वर्गीय प्रल्हाद जाधव, पुंजाजी वाजे, रामदास चव्हाण या दुकादारांच्या वारसांना इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते प्रत्येकी २५ हजारांचा धनादेश देऊन संघटनेतर्फे आर्थिक सहाय्य देण्यात आले.
जगात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलाव होत असुन रेशन दुकानदार आपल्या व कुटुंबाच्या आरोग्याची पर्वा न करता धान्यवाटपाचे काम करीत आहेत. इतर शासकीय कर्मचाऱ्यांसह त्यांच्याही आरोग्य व संरक्षणाचा शासनाने विचार करावा. त्याच बरोबर शासनाने कोरोना काळात ज्या रेशन दुकानदारांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला त्यांच्या वारसांना ५० लाख रूपये विमा कवच रक्कम जाहिर केली होती ती अडा4 करावी अशी मागणी केली.
करोना काळात मशीनवरील थंब बंद करून सरसकट मशीन सुरू करण्याचे आदेश द्यावे, पीएमजीकेवायचे शिल्लक असलेले गहु, तांदुळ व चणादाळ वाटपाचे नियोजन करावे, तालुक्यातील सर्व रेशन दुकानधारकांसह कुटुंबियांना कोविड १९ चे लसीकरण करण्यात यावे. आदी प्रमुख मागण्याचे निवेदन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना दिले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे, विभागीय अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील, तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष शशीकांत उबाळे, उपाध्यक्ष अरूण रामदास भागडे, सचिव संजय गोवर्धने, सहसचिव बाळासाहेब घोरपडे, सदस्य गुलाब वाजे, गोविंद धादवड, सागर शिरसाठ, जिजाबाई घोंगडे, मधुकर शिंदे, शितल पारख, बबलु गटकळ, महेंद्र आडोळे, शिवाजी पोरजे, गौतम पंडित, प्रकाश नाठे, मोहनलाल रावत, मल्हारी गटकळ, गणेश वाजे, विजय चव्हाण आदी उपस्थित होते.