इगतपुरीनामा न्यूज, दि. २७
तरुणांचे भविष्य उध्वस्त करणाऱ्या मोदी सरकारच्या , अग्निपथ योजनेमुळे देशभरातील तरुण आणि त्यांच्या परिवारामध्ये संतापाचे वातावरण आहे. यामुळे देशाच्या भवितव्यावर दुरगामी परिणाम होणार आहेत. या निर्णयामुळे राष्ट्रीयत्वाला धोका पोहोचला आहे. म्हणून ही योजना तात्काळ रद्द करून पूर्वीप्रमाणे अंमलबजावणी करावी. अन्यथा मोदी सरकार विरोधात कठोर आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी दिला आहे. मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात इगतपुरी तालुका इंदिरा काँग्रेसने गोंदे दुमाला फाट्यावर मुंबई आग्रा महामार्गांवर केलेल्या आंदोलनप्रसंगी ते बोलत होते. तरुणांचे आयुष्य बरबाद करणाऱ्या अग्निपथ योजनेमुळे न भूतो न भविष्यती असे नुकसान करणाऱ्या मोदी सरकारचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो असे उदगार काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे यावेळी म्हणाले. ह्या आंदोलनावेळी आमदार हिरामण खोसकर, ॲड. संदीप गुळवे आदींच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, युवक उपस्थित होते. आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव, माजी सभापती गोपाळ लहांगे, ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष जनार्दन माळी, शेतकरी नेते पांडुरंग शिंदे, माजी सभापती संपत काळे, कचरू पाटील शिंदे, सुदाम भोर, जयराम धांडे, बाळासाहेब कुकडे, देवराम मराडे, ॲड. जी. पी. चव्हाण, रामदासबाबा मालूंजकर, उत्तम भोसले, तुकाराम वारघडे, चेअरमन अरुण गायकर, सचिन तारगे, उपसरपंच दत्तू मते, गोकुळ मते, दिलीप गुळवे, लकी गोवर्धने, संतोष गुळवे, संतोष सोनवणे, संजय बोऱ्हाडे, वाडीवऱ्हे गटाचे अध्यक्ष आकाश दिवटे, ज्ञानेश्वर धोंगडे, ज्ञानेश्वर झोले, दीपक गायकवाड, नंदराज गुळवे, विष्णू धोंगडे, ज्ञानेश्वर धोंगडे, प्रतीक गोवर्धने, संतोष सोनवणे, गणेश कौटे, प्रकाश पंडित, गौतम गरुड आदी युवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने, सोमनाथ बोऱ्हाडे, पोलीस हवालदार शेख, पोलीस नाईक पवार, पोलीस नाईक चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.