सीतामाई मराठा मंडळातर्फे ६ मार्चला वधुवर मेळावा

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४

सोमनाथ आबा युवा फाउंडेशन, निफाड तालुका व सीतामाई मराठा वधू-वर सूचक मंडळातर्फे वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा, कुणबी, देशमुख तसेच सकल मराठा समाजातील विवाह इच्छुक नव वधू- वर, विधूर, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या अशा सर्वांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी 6 मार्चला सीतामाई लॉन्स व मंगल कार्यालय, खडक माळेगाव, ता. निफाड येथे दुपारी 11 ते 4 या वेळेत हा मेळावा संपन्न होईल. इच्छुक वधू-वर व पालकांनी ह्या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन डी. के. ठाकरे यांनी केले आहे. ह्या मेळाव्यात निफाडचे माजी आमदार अनिल कदम, सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, चांदवड कृऊबा सभापती आत्माराम कुंभार्डे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

Advt

Leave a Reply

error: Content is protected !!