इगतपुरीनामा न्यूज, दि. २
इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले. इगतपुरी शहरातील ईगतपुरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आमदारांच्या 58 व्या जन्मदिनाच्या अनुषंगाने 58 जणांकडून रक्तसंकलन करण्यात आले. आमदार खोसकर हे रुग्णमित्र म्हणून ओळखले जात असल्याने ह्या रक्तामुळे रुग्णांना मदत होणार असल्याचे गोरख बोडके यावेळी म्हणाले. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर ह्या दोन्ही तालुक्यात वाढदिवसाचे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, स्विय सहाय्यक संदीप डावखर यांनी आमदार हिरामण खोसकर यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त इगतपुरी येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. ईगतपुरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेल्या ह्या स्तुत्य उपक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. 58 रक्त पिशव्यांचे संकलन करुन आमदार खोसकर यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. ह्या रक्तामुळे अनेक गरजूंना जीवदान मिळण्यास मदत होणार आहे. गोरख बोडके आणि संदीप डावखर यांच्या उपयुक्त उपक्रमामुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणित झाला असल्याचे आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले. यावेळी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे, नगरपरिषद मुख्याधिकारी पंकज गोसावी, वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, गटविकास अधिकारी लता गायकवाड, भूमी अभिलेख अधिकारी भाबड, काँग्रेसनेते जनार्दन माळी, भोलेनाथ चव्हाण, अनिल भोपे, सिद्धेश्वर आडोळे आदी उपस्थित होते.