इगतपुरी तालुक्यात आज नवे १७ कोरोना पॉझिटिव्ह ; ३७७ कोरोना बाधितांवर उपचार सुरू

इगतपुरीनामा न्यूज, दि. 6
वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मिनी लॉकडाऊनला इगतपुरी तालुक्यात संमिश्र प्रतिसाद लाभला. प्रशासनाकडून सविस्तर मार्गदर्शन उपलब्ध झाल्यावर मिनी लॉकडाऊन खऱ्या अर्थाने अंमलात येईल. आज इगतपुरी तालुक्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 17 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आज दिवस अखेर 377 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा, प्रशासन यांच्याकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी सूचनांचे तंतोतंत पालन केल्यास कोरोनावर विजय मिळवता येऊ शकतो असे जाणकार नागरिकांनी सांगितले.
मिनी लॉकडाऊन बाबत संमिश्रता असली तरी तालुक्यातील प्रमुख गावांत याबाबत नागरिकांनी आदेशांचे पालन केले. या अनुषंगाने आज दिवसभरात 17 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोविड लसीकरण केंद्रांवर 45 वयोगटासह जेष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. ऑनलाईन नोंदणीच्या अटीमुळे ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांना ताटकळत बसवले जात आहे. काही आरोग्य कर्मचारी नागरिकांशी व्यवस्थित न बोलता अरेरावी करीत असल्याचेही दिसून आले आहे.

Igatpuri Taluka
Date 06/04/2021@5:00PM

 1. Total no of positive cases:2581
 2. Today’s positive cases_17
 3. Nagarparishad area:592
 4. Zp area:1989
 5. Total Discharge :2160
 6. Death:44
 7. Active cases in CCC:35
 8. Active case in DCHC:18
 9. Active cases in DCH_03
 10. Active cases in Private Hospital -05
 11. Positive cases home isolated-316
 12. Total active cases-377
 13. Swab awaiting:196
 14. Total containment zone:255
  15 . Active containmentzone:24
 15. Total population of containment zone:43513
 16. Active team:24
  18 Antigen kit test_17/98

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!