सांजेगाव भागातील अपघातात ४ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेमुळे मिळाला तात्काळ उपचार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३

इगतपुरी तालुक्यातील अपघातांनी लोकांच्या पोटात भीतीचा गोळा येत असला तरी अपघात मात्र होतच आहेत. आज सांजेगाव भागात मोटारसायकलला समोरून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने ठोकल्याने अपघात झाला. ही घटना सायंकाळी सहा वाजेच्या सुमाराला घडली. ह्या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड हे तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा प्राण वाचायला मदत झाली.

MH 15 DD 0569 ही मोटारसायकल सांजेगावकडुन वाडीवऱ्हेच्या दिशेने जात असताना अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना समोरून धडक दिली. यामध्ये योगेश किसन नवले वय 30, रोहिणी योगेश नवले 19 रा. शेंडीचा मेट, चेतन मच्छिंद्र अस्वले वय 15 रा वाडीवऱ्हे, सदगुरू कचरू खाडे वय 28 रा. कावनई हे गंभीर जखमी झाले आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!