वाढदिवसानिमित्त आदिवासी पाड्यावर फराळ वाटप :
युवा नेते भावडू बोडके यांचा आदर्श उपक्रम

सुनिल बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

वाढदिवस म्हटला की अनाठायी खर्च आणि मोठ्या हॉटेल मध्ये पार्टी. परंतु या सर्व खर्चाला फाटा देत वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करून काँग्रेसचे युवा नेते भावडू बोडके यांनी आदर्श घालून दिला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे येथील हेदुलीपाडा येथे मिठाई वाटून वाढदिवस साजरा केला.
यावेळी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, शिवसेना नेते समाधान बोडके पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा नेते अरुण मेढे पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा हरसूल गटाचे नेते इंजि.विनायक माळेकर, मनसे तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे, ॲड. भास्कर मेढे, ॲड. शरद मेढे, शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय मेढे, उपसरपंच राजू बोडके, शिवसेना वाघेरा गणप्रमुख अशोक उघडे यांनी शुभेच्छा दिल्या.

“ज्या समाजाचे नेतृत्व करतो त्या समाजात जाऊन वाढदिवस साजरा करावा असे मनात होते. अनाठायी खर्च वाचवुन गरिबांच्या चेहऱ्यावरचा आनंद सुखावून गेला. गरीब पाड्यावर जाऊन वाढदिवस साजरा केल्याने अनेकांनी आशीर्वाद दिले.
– भावडू बोडके, युवा नेते काँग्रेस

Leave a Reply

error: Content is protected !!