जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक : “ह्या” तारखांना गट गणांचे आरक्षण काढणार असल्याचा अंदाज

भास्कर सोनवणे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय आरक्षणाची वाट पाहणाऱ्या उत्सुक लोकांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षण काढण्यासाठी जिल्हा आणि तालुका प्रशासनाला अद्याप कोणत्याही सूचना नाहीत. “इगतपुरीनामा” कडे आलेल्या गोपनीय माहितीनुसार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान आरक्षण काढण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यानंतर निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार असून इच्छुकांच्या निवडणूकपूर्व तयारीला वेग येणार आहे. दिवाळी आटोपताच राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा प्रशासनाला याबाबतच्या स्पष्ट सूचना दिल्या जाणार असल्याचे समजते.

जिल्हा परिषद पंचायत समित्यांची निवडणूक पुढील वर्षात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होण्याचे संकेत मिळत असून मात्र यासाठी गट आणि गणांचे आरक्षण अद्याप लटकलेले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांतील इच्छुकांना मोर्चेबांधणी करण्यासाठी हालचाल करता येत नाही. आरक्षणाबाबत रोजच अनेक अफवा पसरली जाते. विविध ठिकाणी चौकश्या करून इच्छुक कंटाळले आहेत. जिल्हा आणि तालुका प्रशासनाला स्पष्ट सूचना नसल्याने तेथेही शांतता आहे. त्यामुळे आरक्षणाकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
“इगतपुरीनामा”कडे याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यावरून १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान आरक्षण सोडत आणि महिलांसाठी कोणते गट गण आरक्षित करायचे याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. दिवाळीची धामधूम संपताच राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षण संदर्भात जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या जातील असे समजते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!