बलायदुरीच्या युवकाची माणिकखांबजवळ रेल्वेखाली आत्महत्या : इगतपुरीजवळ आत्महत्येच्या अवस्थेत जंगलात सापडला अनोळखी मृतदेह

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८

इगतपुरी तालुक्यात आज आत्महत्येच्या दोन घटना उघडकीस आल्या. पहिल्या घटनेत माणिकखांब गावाजवळ रेल्वेखाली एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आज दुपारी साडेतीनच्या सुमाराला ही घटना घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे. संदीप कांतीलाल दालभगत वय 35
मूळ गाव बलायदुरी असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असून तो माणिकखांब गावाचा जावई आहे. सध्या तो माणिकखांब येथे वास्तव्याला होता. यामुळे इगतपुरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

दुसऱ्या घटनेत इगतपुरी येथील घाटनदेवी भागातील जंगलात आंब्याच्या झाडाला अडकवलेल्या नायलॉन दोरीने गळफास घेऊन ५० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. आज दुपारी ४ वाजता रितेश कदम हे मित्रांसह जंगलात फिरत असतांना ही घटना उघडकीस आली. ह्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सडलेला असून आत्महत्या नेमकी कधी झाली याबाबत बोध झालेला नाही. याबाबत आपत्ती व्यवस्थापन टीमने घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांना सहाय्य केले. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, लोहरे, अभिजित पोटिंदे यांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सुरुवात केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!