इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
बोरटेंभे येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त युवाशक्ती मित्रमंडळातर्फे सर्वरोग निदान शिबिर संपन्न झाले. नेत्र, दंत, रक्तगट तपासणी इतर रोगांवर तपासणी करुन उपचार देण्यात आले. शिबिरात एकूण १८० रुग्णांनी सहभाग घेतला. ६० रुग्णांना मोफत चष्मा तर दहा रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी इतर आजारांवर योग्य ते उपचार देण्यात आले. सरपंच अनिल भोपे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे अनेक प्रसंग आपल्या मनोगतात मांडले. आजच्या पिढीला त्यांच्या मूलमंत्राचा जीवनात होणारा फायदा त्यांनी सांगितला. याप्रसंगी नांदगाव सदो प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रागिणी गांगुर्डे, घोटी ग्रामीण रुग्णालयाचे नेत्रचिकित्सक डॉ. शरद बगडाने, दंत चिकित्सक डॉ. सचिन माकने, रघुनाथ तोकडे, हिरामण लहाने, सरपंच अनिल भोपे , युवाशक्ती मित्र मंडळाचे सर्व सदस्य व बोरटेंभेचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.