इनर व्हील क्लब नाशिक यांच्या दातृत्वातून इंदिरानगर गाळोशी या दत्तक शाळेला भोजनगृह शेडची भेट

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७

नाशिक तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर येथे इनरव्हील क्लब नाशिक यांचे मार्फत विविध उपक्रम साजरे करण्यात येत आहेत. या संस्थेने ही शाळा दत्तक घेऊन असून अनेक भौतिक सुविधा शाळेस पुरविल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात इनर व्हील क्लब तर्फे शाळेतील तीनशे दोन विद्यार्थ्यांना ओरल दिनाचे औचित्य साधून टूथब्रश व टुटपेस्ट वाटप करण्यात आले. मौखिक स्वच्छता व आरोग्यविषयक काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

मुलांना सफरचंद, पेरू, डाळिंब, मोसंबी आदी फळांचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना राखी बनवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. पावसाळ्यात मुलांची भोजनासाठी होणारी हेळसांड बघता एक मोठे भोजनगृह शेड उभारण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंतची मदत जाहीर केली आहे. सदर कामासाठी दहा हजार आणि बहात्तर हजार असे दोन चेकही देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी इनरव्हील संस्थेच्या अध्यक्षा वैशाली चौधरी, आशा घाटगे, स्मिता जोशी, बेला गुजराती, लिला भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पूजा बेंडकोळी तर आभार प्रदर्शन ममता पारधी या विद्यार्थीनींनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रमोद लोखंडे, त्र्यंबक दिवे, संजय लिलके, अनघा पवार, रमेश पवार, चित्रा भोये, गणेश पाखरे, श्रीनिवास बुधलवाड, अरुणा गावित यांनी परिश्रम घेतले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!