अडसरे बुद्रुकला बिबट्या जेरबंद

इगतपुरीनामा न्यूज, दि. 6 ( शैलेश पुरोहित )
इगतपुरी तालुक्यात काही दिवसांपासून डोंगरांना आग लावण्यात येत असल्यामुळे गावामध्ये बिबट्या व जंगली प्राण्यांच वावर जास्त प्रमाणात वाढला आहे. तालुक्यातील अडसरे बुद्रुक येथे रोज रात्री बिबट्याचा वावर होत होता. वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी ट्रॅप कॅमेरे, पिंजरे लावून ठेवले होते. आज पहाटे एक बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. अजूनही काही बिबटे असल्याचा संशयाने ट्रॅप कॅमेरे व पिंजरे  लावून ठेवण्यात येणार आहे. यावेळी इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वन परिमंडळ अधिकारी इ. टी. भले, वनरक्षक संतोष बोडके, एफ. जे. सय्यद, पाठक, पाडवी, खाडे, चालक मुजाहिद शेख आदींनी परिश्रम घेतले.