विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कोरोनाला आता हरवायचंय….. !!

विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद
लेखन : सिद्धार्थ सपकाळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टिटोली ता. इगतपुरी, जि. नाशिक

माझ्या विद्यार्थी मित्रांनो, कोरोना पुन्हा नव्याने मोठ्या प्रमाणात वाढतोय. त्यासाठी आपण तात्पुरत्या स्वरूपात तुम्हांला शाळेत येण्यावर थोडी बंधनं घातली आहे. तुमची सर्वांची काळजी वाटते म्हणुनच. कारण आता कोरोना हा विषाणु लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणावर होतांना दिसुन येतोय. त्यासाठी आपण सर्वांनी घरी राहुन आपली काळजी घेतलीच पाहिजे.

आपले आई बाबा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी बाहेर जात आहेत. त्यांना तर जावंच लागेल तुमची हौस, खाऊ , तुम्हांला दोन वेळचे जेवण मिळावे ह्यासाठी. यासाठी तुम्ही आता घरी राहुन नेमकं काय करणार….. तर खालील गोष्टी नियमित करा.

आपले आई बाबा कामानिमित्त बाहेर जात असतील तर त्यांना मास्क, सॅनिटायझर सोबत घेऊन जाण्याची आठवण करा.

कामावर अथवा नोकरीच्या ठिकाणी त्यांना सुरक्षित अंतर ठेवण्याचीही आठवण करून द्या.

कामावरून अथवा बाहेरून आल्यावर आपल्या आई – बाबांना स्वच्छ हात धुण्याची आठवण करून द्या.

तुम्ही स्वतः घराबाहेर जाऊच नका.

घरी राहुन तुम्ही आपल्या लहान मोठ्या भावंडांशी किंवा आजी आजोबांशी छान गप्पा गोष्टी करा. गाणी, शालेय कविता म्हणा.

दररोज छान छान गोष्टींची पुस्तके वाचा. घरातील आजी आजोबांना वाचुन दाखवा.

आई किंवा वडील अथवा आजी आजोबा यांना लिहायला वाचायला शिकवण्याचा प्रयत्न करा.

घरात आईला घरकामात मदत करा.

आपल्या घरी वर्तमानपत्र येत असल्यास दररोज त्याचे वाचन करा.

छान छान चित्र काढा. ती चित्रं छानशी रंगवुन चित्राचा फोटो काढुन आपल्या वर्गशिक्षकांना पाठवा.

घरा शेजारी अथवा गल्लीत कोणी कोरोना पेशंट असल्यास त्यांचा तिरस्कार करू नका तर धिर द्या. घरातील मोठ्या व्यक्तींमार्फत त्यांना मदतीचा सर्व नियम पाळुन मदत करा.

तुम्हाला आवडणाऱ्या कला गुणांना वाव द्या….
( उदा. चित्र काढणे, नृत्य करणे वाचन करणे, लेखन करणे. )

छान छान अशा छोट्या छोट्या कविता तयार करून लेखन करण्याचा प्रयत्न करा.

घरच्या घरी टाकाऊ वस्तुंपासुन टिकाऊ वस्तु बनवा. त्यासाठी युट्युब वरील व्हिडीओ पहा.

आपल्या घरी संगणक असल्यास Microsoft word, Excel, Powerpoint, Paint इ. शिकण्याचा प्रयत्न करा.

आपल्या भावंडांसोबत छोटी छोटी नाटकं तयार करा, संवाद तयार करा.

इंग्रजीतले शब्दार्थ पाठांतर करा. छोटी छोटी दैनंदिन वापरात येणारी वाक्य तयार करून आपल्या कुटुंबासोबत अथवा भावंडांसोबत इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करा. ( उदा. Come here, How are you ? plz tell me….. Give me……)

घरी राहुन नुसतीच मज्जा करणे हे चांगले नाही मज्जा करणे सोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम करा.

आपल्या गावांत घराशेजारी कोरोनाचा शिरकाव होणार नाही अशी प्रत्यक्ष कृती करून संकल्प करूया.

आपल्याला सर्वांनी मिळुन कोरोना या विषाणुची Chain ब्रेक करायची आहे. त्यासाठी प्रतिबंधाच्या सर्व नियमांचे तुम्हीही पालन करा आणि इतरांनांही सांगा.

मग कराल ना वरील सर्व गोष्टी… निश्चितच तुम्ही कराल याची आम्हांला खात्री आहे आणि तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे…. !!!

आपलेच
सर्व शिक्षकवृंद
सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
इगतपुरी तालुका

Similar Posts

Comments

Leave a Reply

error: Content is protected !!