स्व. बापूराव गभाले यांच्या स्मरणार्थ टिटोली शाळेला सुसज्ज मंच आणि व्यासपीठाचे लोकार्पण

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

समाजासाठी काहीतरी करण्याची उमेद असूनही अनेक व्यापांमुळे समाजसेवा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. शिक्षणासारख्या पवित्र कार्यात आपलेही योगदान असावे अशी मनीषा सुद्धा दुर्दैवाने अधुरी राहून जाते. असेच समाजसेवेचे स्वप्न अपूर्ण राहिलेले माजी सरपंच स्व. बापूराव शामराव गभाले यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त इगतपुरी तालुक्यातील टिटोली येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी मराठी शाळेला भरघोस मदत मिळाली आहे. त्यांचे सुपुत्र माजी सरपंच भरत गभाले, विद्यमान सरपंच काजल गभाले यांच्याकडून शाळेसाठी विविध कार्यक्रम घेण्यासाठी सुसज्ज मंच बांधून देण्यात आला. यासह उभे राहून भाषण करण्यासाठी दर्जेदार व्यासपीठ लोकार्पण करण्यात आले.

गभाले परिवाराकडून शाळेसाठी अमूल्य सहकार्य नेहमीच मिळत असले तरी आजच्या मदतीमुळे शाळेचे नाव उंचावण्यास मदत होणार असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा उपसरपंच अनिल भोपे यांनी सांगितले. या लोकार्पण कार्यक्रमावेळी स्व. बापुराव शामराव गभाले यांच्या स्नुषा टिटोलीच्या विद्यमान सरपंच काजल गभाले, उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल भोपे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती बोंडे, भरत हाडप, तानाजी बोंडे, संग्राम ग्रुपचे अध्यक्ष महेश भटाटे, रोटरी क्लब ऑफ नॉर्थ बॉम्बेचे धनराज म्हसणे, भगिरथ बोंडे, गणेश बोंडे उपस्थित होते. सुत्रसंचालन सिद्धार्थ सपकाळे यांनी केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!