इगतपुरीत आज “एवढे” कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले ; आरोग्य व्यवस्थांची राज्यमंत्री तनपुरेंकडून पाहणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
इगतपुरी तालुक्यात आज दिवस अखेर 32 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान झाले. तालुकाभरात 370 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यात एकूण 255 कंटेंटमेंट झोन असून त्यापैकी 24 कंटेंटमेंट झोन सक्रिय आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत असून जनजागृती सुद्धा सुरू आहे. तथापि घोटी, इगतपुरी आदींसह ग्रामीण भागातील बेशिस्त नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. आगामी काही दिवसात नागरिकांत शिस्त न दिसल्यास मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा उद्रेक होण्याची चिन्हे आहेत. 2 ग्रामीण रुग्णालये, 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना लसीकरण सुद्धा प्रगतीपथावर आहे.

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्र्यांकडून इगतपुरीत आढावा

इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयातील कोरोना लसीकरण, आरोग्य सेवा, व्यवस्थापन आदींची पाहणी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज दुपारी केली. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे यांनी यावेळी मंत्रीमहोदयांना पाहणीवेळी माहिती दिली. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी संपूर्ण तालुक्यातील आरोग्य स्थितीचा आढावा देऊन प्रशासकीय यंत्रणा सक्षमतेने काम करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी आरोग्य विभाग राबवत असलेल्या उपाययोजना आणि मिळत असलेले लक्षणीय यश ह्यावर ह्यावेळी प्रकाशझोत टाकला. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कायदा सुव्यवस्था चोखपणे पार पाडीत असल्याबाबत साधकबाधक माहिती दिली. यावेळी तहसीलदार परमेश्वर कासुळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे, पोलीस निरीक्षक दिपक पाटील, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर आदी उपस्थित होते.

काय म्हणाले मंत्री महोदय ?

इगतपुरी तालुक्यात महसूल प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा आदींचा समन्वय असल्याने अतिशय चांगली कामगिरी दिसते आहे. राज्य शासन नागरिकांच्या सोबत असल्याने प्रत्येक घटनेवर सर्व यंत्रणा सूक्ष्मपणे लक्ष ठेवून आहे. इगतपुरी तालुक्यात सर्व शासकीय विभाग चांगले काम करीत असल्याचे दिसुन आले.
ना. प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

इगतपुरी तालुक्यातील दि. ५ एप्रिल २०२१ सायं ५ वाजेपर्यंतची स्थिती खालीलप्रमाणे

 1. Total no of positive cases:2564
 2. Today’s positive cases_32
 3. Nagarparishad area:592
 4. Zp area:1972
 5. Total Discharge :2150
 6. Death:44
 7. Active cases in CCC:45
 8. Active case in DCHC:18
 9. Active cases in DCH_03
 10. Active cases in Private Hospital -05
 11. Positive cases home isolated-299
 12. Total active cases-370
 13. Swab awaiting:102
 14. Total containment zone:255
  15 . Active containmentzone:24
 15. Total population of containment zone:43513
 16. Active team:24
  18 Antigen kit test_32/132

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!