इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
कालच्या दिवशी एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नसल्याने दिलासा मिळालेल्या इगतपुरी तालुक्यात आज 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान झाले. यापूर्वी रुग्ण सापडलेल्या घोटी, टाकेद, कांचनगाव आदी गावातच हे रुग्ण सापडले आहेत. सध्याच्या स्थितीत 150 च्या आसपास कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा उपद्रव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासन उत्तम काम करीत आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन करावे. जेणेकरून कोरोनाचे समूळ उच्चाटन होणे शक्य असल्याचे डॉ. देशमुख म्हणाले.
