व्यक्तिगत स्वच्छता आणि सामाजिक विलगीकरणासह रोजच्या रोज सर्व प्रकारची काळजी सतत घेणे आणि तुमच्या कुटुंबातल्या सर्वांना ही काळजी घ्यायला लावणे ही पहिली महत्त्वाची गोष्ट. घरातील वयस्कर व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि आधीच कोणत्या ना कोणत्या शारीरिक व्याधीनी ग्रस्त असणारे कुटुंबीय यांनी / यांच्यासाठी अधिक काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
१. संसर्ग झालेल्या, आजारी व्यक्तींशी निकट संपर्क टाळा.
२. तुम्ही स्वत: आजारी असाल, तर तातडीच्या वैद्यकीय मदतीखेरीज अन्य कोणत्याही कारणाने, कोणत्याही वेळी घराबाहेर पडू नका.
३. खोकला आला अगर शिंक आली, तर अशा वेळी तुमचे तोंड बाहीच्या आतल्या भागाने झाका अगर टिश्यू पेपर / रुमाल वापरा. हा टिश्यू पेपर नंतर नष्ट करा. रुमाल स्वच्छ धुवा.
४. तुमचे हात सतत आणि स्वच्छ धुवा.
नाक शिंकरणे, खोकणे, शिंकणे, लघवी अगर शौचाला जाणे या प्रत्येक वेळी.. तसेच स्वयंपाक करण्याआधी आणि काहीही खाण्या आधी तुमचे दोन्ही हात साबण लावून किमान वीस सेकंद परस्परांवर घासा आणि पाण्याने स्वच्छ धुवा.
साबण आणि पाणी नसेल, तर ज्यात किमान ६०% अल्कोहोलचे प्रमाण आहे, अशा सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ करा.
हात अस्वच्छ असतील तर साबण लावूनच स्वच्छ धुवा.
५. तुमच्या घरातला फोन, प्रत्येकाचे मोबाईल फोन्स, टेबल, स्वयंपाकाचा ओटा, विजेची अन्य उपकरणे आणि बटणे, दरवाजाच्या मुठी, कड्या, कोयंडे, कपाटांची हॅण्डल्स.. ज्या ज्या ठिकाणी घरातल्या व्यक्ती सतत स्पर्श करतात, ते-ते सर्व पृष्ठभाग स्वच्छ असतील आणि जंतुनाशक द्रावणाने पुसलेले असतील अशी काळजी घ्या.
६. कोरोनापासून बचाव आणि कोरोनापासून मुक्तीसाठी उपयुक्त बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधीचे नियमित सेवन करा. ही औषधी जवळच्या मेडिकल दुकानात मिळेल. अमेझॉन अँपवर सुद्धा ही औषधी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 7038394724 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.