इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१
एम्पथी फाउंडेशन मुंबई व इगतपुरी तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे सर्व शिक्षक यांच्यावतीने स्व. शांतीलाल छेडा यांच्या स्मरणार्थ आरोग्य विभागासाठी 15 लाख 50 हजार रुपये किमतीची अत्याधुनिक रुग्णवाहिका भेट देण्यात आली. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शांतीलाल छेडा यांचे पुतणे राजमल छेडा, आमदार हिरामण खोसकर, एम. आर. सुंदरेश्वरम यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे इगतपुरी पंचायत समिती येथे लोकार्पण करण्यात आले. एम्पथी फाऊंडेशन मुंबई यांनी नाशिक जिल्ह्यात 47 शाळा बांधलता असून त्यासाठी 21 कोटी रुपये खर्च केला आहे. त्यापैकी एकट्या इगतपुरी तालुक्यात आतापर्यंत 14 कोटी रुपये खर्चून आर्थिक सुविधांनी सुसज्ज अशा 21 शाळा बांधल्या आहेत. एम्पथी फाऊंडेशनचे ट्रस्टी शांतीलाल छेडा यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या स्मृती जतन व्हाव्यात यासाठी त्यांच्या स्मरणार्थ इगतपुरीतील शिक्षकांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला. त्यासाठी तालुक्यातील शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने निधी जमा केला. एम्पथी फाउंडेशन यांनी त्यात काही भर घालून रुग्णवाहिका घेण्यात आली. यावेळी स्कील रॉक या कंपनीच्या सहकार्याने आरोग्य विभागासाठी विकसित केलेले अत्याधुनिक तपासणी किटचे देखील प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. इगतपुरी तालुक्यात आरोग्य पायलट प्रोजेक्ट राबविण्याच्या बाबतीत फाउंडेशन विचार करीत असल्याचे श्री. सुंदरेश्वरम यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी शिक्षकांचे कौतुक करून फाउंडेशनचे आभार मानले. आरोग्य आणि शिक्षण यासाठी काम करताना प्रशासन सहकार्य करेल असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष सभापती सोमनाथ जोशी यांनी सर्वांना धन्यवाद दिले. एम्पथी फाउंडेशनला रुग्णवाहिकेसाठी निधी जमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, पदवीधर शिक्षक संघटना, मागासवर्गीय शिक्षक संघटना, स्वाभिमानी आदिवासी शिक्षक संघटना, शिक्षक भारती संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना या संघटनांनी मोलाचे योगदान दिले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, सहाय्यक अंबादास पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. इगतपुरी तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने निवृत्ती नाठे, दत्तात्रय दातीर, सिद्धार्थ सपकाळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सभापती सोमनाथ जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी एम्पथी फाउंडेशनचे दिनेश झोरे , इंजि. सचिन चौधरी, स्किल रॉक कंपनीचे सिनियर मॅनेजर राहुल सहानी, हेल्थ असोसिएट मनीष, उपसभापती विठ्ठल लंगडे, माजी उपसभापती भगवान आडोळे, शिवसेना तालुका नेते राजाभाऊ नाठे, रघुनाथ तोकडे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, गटशिक्षणाधिकारी राजेश तायडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख आदींसह शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष निवृत्ती नाठे, उमेश बैरागी यांनी तर जनार्दन कडवे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्तात्रय दातीर, सचिन कापडणीस, संतोष श्रीवंत, माणिक भालेराव, राजेश खैरनार, चंदर कोरडे, दिलीप धांडे, आप्पा जाधव, सिद्धार्थ सपकाळे, वैभव गगे आदींनी
परिश्रम घेतले.