लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 24
इगतपुरी तालुक्यातील वैतरणागर, नागोसली या गावांची वाटचाल स्वच्छतेकडे झाली आहे. ग्रामपंचायतीच्या अथक प्रयत्नाने बांधले सार्वजनिक स्वच्छतागृह दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर सरपंच आशा गिऱ्हे यांनी लोकार्पण यांनी केले. घरातील अथवा सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर गावातील कुटुंबांनी केल्यास स्वच्छतेकडे एक पाऊल पुढे राहणार असल्याचे सरपंच आशा गिऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
गावातील सांडपाण्यासाठी शोष खड्ड्यांची व्यवस्था असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सार्वजनिक स्वच्छतागृह झाल्याने पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. लोकार्पण कार्यक्रमावेळी ग्रामसेवक संभाजी मार्कंडे, ग्रामपंचायत सदस्य सुमन गाडेकर, नितीन खातळे, सामाजिक कार्यकर्ते विजय गडाळे, शांताराम खोडके, भगवान गोजरे, तुकाराम गिऱ्हे, दत्तू गिरे, हनुमंत शिद, कुणाल पवार, बबन शिंदे, गोपीचंद खातळे, शिवाजी खातळे, धर्मराज खोडके, सचिन तेलंग, श्रावण दिवे, विष्णू शिंदे, अरुण शेलार, संतोष खोडके, सचिन शेलार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.