शेनीत येथील २३ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

इगतपुरीनामा न्यूज, दि. १०

इगतपुरी तालुक्यातील शेनीत येथील सुषमा निलेश भवर ही २३ वर्षांची विवाहित महिला आज दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास बेपत्ता झाली आहे. तिचे वडील दिलीप लक्ष्मण बनसोडे यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली आहे. घरात कोणाला काही न सांगता ही विवाहित महिला घरातून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ह्या महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास वाडीवऱ्हे पोलीस ठाणे अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या प्रकरणी तपास सुरू झाला आहे.

अधिक माहिती अशी की, शेनीत ता. इगतपुरी येथील सुषमा निलेश भवर वय २३ ही विवाहित महिला आज दि. १० रोजी दुपारी ३. ४५ वाजता राहत्या घरून बेपत्ता झाली. तिने कोणालाही न सांगता घर सोडले असल्याचे समजताच तिचे वडील दिलीप लक्ष्मण बनसोडे रा. ओढा ता. जि. नाशिक यांनी
वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. सुषमा भवर  ही अंगाने सडपातळ असून रंगाने गोरी आहे. उंची १६५, केस काळे लांब, गळ्यात काळ्या पिवळ्या रंगाची पोत, डोळे काळे, सहावारी साडी असे तिचे वर्णन आहे. तिच्याबाबत कोणाला काहीही माहिती मिळाल्यास वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक ०२५५३ २३६५३३, पोलीस हवालदार जी. एस. परदेशी ९३२५२५९५८३ अथवा नजीकच्या पोलीस ठाण्याला कळवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!