कोरोना : एक महामारी

जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना महामारीवर प्राथमिक शिक्षिका माधुरी पाटील यांनी लिहिलेले ‘कोरोना : एक महामारी’ हे गीत

अहो कोरोनाने घातले ना थैमानं
या कोरोनावर मात करणारं..
!! धृ.!!

मास्क, सॅनिटायझरचा वापर करणारं…
नियम शासनाचे, आम्ही पाळणार..
त्या विषाणूला, हाकलुनी लावणार..!!१!! 
या कोरोनावर

सर्दी, खोकला, तापाची टेस्ट करणारं..
गरमपाणी, काढा उकळुनी पिणारं
उपचार डॉक्टरांचा, मी घेणार..!!२!!
या कोरोनावर…

पॉझिटिव्ह आल्यास, नाही फिरणार..
महामारीला या, मी नाही पसरवणार…
घरासोबत, गावाची काळजी ती घेणार…!!३!!
या कोरानावर

सात फुटाचे अंतर, आम्ही ठेवणार..
विनाकारण बाहेर, नाही फिरणार
नियमांचे पालन, ते होणार..!!४!!
या कोरोनावर
 
झाला जरी कोरोना, नाही घाबरणार..
दुसऱ्यांना मी तो, धीरचं देणारं
घरातचं क्वारंटाईन होणार..!!५!!
या कोरोनावर…

कोरोनाची लस ती, आम्ही घेणार
रोगप्रतिकारक शक्ती, आमची वाढणार..
लस घ्या सर्वांनी, आव्हान मी करणार..!!६!!
या कोरोनावर...

सुरक्षित अंतर ठेवून, कामे करणारं…
घरासाठीच दोन पैसे, मी हो कमवणार….
अहो शासनाला साथ, ती देणारं.!! ७!!
या कोरोनावर…

लॉकडाऊन नको असेल तर, काळजी ती घेणार..
भारत सरकारचे , आम्ही ऐकणार..
जनतेचे साऱ्या ,  हित साधणार..!!८!!

या कोरोनावर मात करणार
या कोरोनाला मात करणार
या कोरोनावर मात करणार

गीत लेखन : सौ. माधुरी केवळराव पाटील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोडाळे
ता. इगतपुरी, जि. नाशिक
संपर्क : 7588493260

हे गीत आवडल्यास नक्की शेअर करा
घरात राहा, सुरक्षित राहा…
माझे कुटुंब, माझी जबाबदारी…
हे म्हणण्याची पुन्हा एकदा वेळ आली…काळजी घ्या घरीच थांबा..!