मी सभापती सोमनाथ जोशी बोलतोय..!

नमस्कार मित्रांनो,
मी आपला शुभचिंतक सभापती सोमनाथ जोशी बोलतोय. आज सुट्टीचा दिवस एक दोन ठिकाणी आमंत्रण असूनही जाणूनबुजून घरी थांबलो. फोनवरच तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि आरोग्य विभागाच्या  कामकाजावर पूर्ण दिवसभर लक्ष केंद्रित करून आढावा घेतला. त्यानंतर मात्र काळजात धडकीच भरली. दररोज कोणती योजना आहे कुठं लाभ मिळेल म्हणून कॉल यायचे. पण आज दिवसभरात तालुक्यातून 8 कॉल आले. सभापती साहेब, बेड शिल्लक नाहीत. काहीतरी करा, ऑक्सिजन मिळत नाही काहीतरी करा. जर येणाऱ्या दिवसात मी काही करू शकेल अशी परिस्थिती नसली तर काय होईल ? आरोग्य विभाग अन शासनाच्या हातून ही शक्य होणार नाही असं झालं तर..? करा डोळे बंद अन बघा काय होईल ते. परिस्थिती हाताबाहेर गेली तर काय होईल ? तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख आणि त्यांची टीम तर त्याची भूमिका चोख बजावत आहेत. सगळे कर्मचारी पुन्हा जोमाने कामाला लागलेत. पोलीस यंत्रणाही सतर्क आहे. तरी इतकी असमर्थता का निर्माण होऊ पाहत आहे ? का आटोक्यात येत नाही हा कोरोना ? कोण थांबवू शकतो हे ? ह्या भयंकर रोगाचे थैमान डोळे बंद करून खूप विचार केल्यावर कळलं. मी थांबवू शकतो ह्या कोरोनाला मानवी बुद्धी पेक्षा हा ताकतवान मुळीच नाही. मी म्हणजे लोकप्रतिनिधी, कर्मचारी, समाजसेवक, नोकरदार, सामान्य नागरिक आणि मी म्हणजे देशभक्त. मला माझा इगतपुरी तालुका वाचवायचा आहे, माझं कुटुंब सुरक्षित ठेवायचं आहे, माझ्यात ही ताकत आहे. छोट्या छोट्या गोष्टही हे शक्य करू शकतात. आपण थांबवू शकतो हे फक्त आपणच…!
■ मी विना मास्क अजिबात घराबाहेर पडणार नाही
■ माझ्या शेजारी कोणीही विना मास्क येऊ देणार नाही. अजिबात येऊ देणार नाही. आधी मास्क लाव मग समोर ये. असे धमकावून सांगणार  कारण माझा जीव धोक्यात येईल.
■ कुठेही स्पर्श झाल्यास हात स्वछ करेन 
■ जितकं शक्य होईल तितके बाहेरील माणसासोबत अलिप्त राहण्याचा प्रयत्न करीन
■ मित्रहो, परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. प्रत्येक व्यक्तीने ह्या युद्धात सहभाग घेतल्याशिवाय यश अपेक्षित नाही. मित्रानो
आपण जाणते आहोत. आता बालिशपणा नको.
मी जिंकेल माझा तालुका जिंकेल सगळे जिंकतील
अन कोरोना हरेल
सारे लढूया अन नक्की जिंकूया
प्रशासनाला सहकार्य करू या

आपला शुभचिंतक
सोमनाथ जोशी, सभापती
पंचायत समिती, इगतपुरी