इगतपुरीनामा न्यूज, दि. 3
इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, नागरिक गंभीर नसल्याचे चित्र आहे. तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात नागरिक विनामास्क फिरत असल्याचे चित्र असून, ठिकठिकाणी त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला आहे. इगतपुरी तालुक्यात आज एकाच दिवशी 53 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यात एकूण उपचार सुरू असणारी रुग्णसंख्या 371 वर जाऊन पोहोचली आहे. तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना प्रशासनामार्फत कारवाई सुरू असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
तालुक्यात कोरोनाच्या नियमांना हरताळ फासल्यामुळे आणि नागरिकांच्या बेफिकिरीमुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 371 वर पोहोचली आहे. प्रशासनामार्फत कोवीड प्रतिबंधक उपाययोजना सुरू असनुही कोरोनाचा दैनंदिन आकडा वाढत असल्याचे चित्र आहे.
गतवर्षी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास रुग्णाचा परिसर सील करणे, इतर उपाययोजना केल्या जात होत्या. मात्र सद्यस्थितीत रुग्णसंख्या वाढल्याने तसे केले जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. होम क्वारंटाईन असलेले रुग्ण बाहेर वावरताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बर्फानी आरोग्य प्लस औषधी उपयुक्त
कोरोना उद्रेकाचा सध्याचा हा काळ अत्यंत कसोटीचा काळ आहे. गेल्यावर्षी पेक्षा ह्यावेळी कोरोना संक्रमण अतिशय वेगाने होते आहे. बर्फानी आरोग्य प्लस ह्या आयुर्वेदिक औषधीमुळे मागील वर्षी मला चांगला फायदा झाला. कोरोनाची बाधा माझ्यापर्यंत आणि माझ्या लाडक्या परिवारापर्यंत येऊ नये म्हणून आमचा परिवार बर्फानी आरोग्य प्लसचे नियमित सेवन करतो. ह्या औषधीचा उपयोग बाधा होऊ नये म्हणून आणि बाधा झाली तर बचावासाठी झाल्याचे अनेक अनुभव आहेत. जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7057235819 ह्या क्रमांकावर संपर्क साधून औषधी उपलब्ध होईल.
– कैलास कडू, माजी सरपंच शेणवड बुद्रुक ता. इगतपुरी