रुग्णांची संख्या १० वरच स्थिर

इगतपुरीनामा न्युज, दि. २९

इगतपुरी तालुक्यावरचे कोरोनाचे सावट दूर होण्याचं चिन्ह दिसू लागलं असलं तरी गेले पंधरा दिवस स्थिर असलेली रुग्ण संख्या मात्र कोरोनामुक्ती पासून तालुक्याला अजूनही लांब ठेवतांना दिसत आहे. आज आलेल्या अहवालानुसार तालुक्यात आज २ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून २ कोरोना रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्यात सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १० वरच स्थिर आहे.

जवळपास पंधरा दिवस रुग्ण संख्या स्थिर असल्यामुळे कोरोनामुक्तीचे स्वप्न लांबणीवर पडत असून लवकरच तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर येवून तालुका कोरोना मुक्त व्हावा अशी अपेक्षा तालुका वासीय बाळगून आहेत. दरम्यान सध्या सर्वच दुकानं आणि आस्थापना दिलेल्या वेळेत पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने बाजार पेठेत गर्दी होत आहे, नागरिकांनी काळजी घ्यावी, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर काटेकोरपणे करावा, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना योग्य ते शारीरीक अंतर ठेवावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी केले आहे.

कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7030288008 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!