संकटांचा सामना करून ज्या महिला टिकून राहतील त्यांची उन्नती कोणीच रोखू शकत नाही – उद्योजिका मथुरा जाधव : महिलांकडुन महिलांनी महिलांच्या सन्मानासाठी केला साकुर येथे सर्वांगीण कार्यक्रम

भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज, दि. २०

झेप घेण्याची इच्छा असणाऱ्या ९५ टक्के महिला नानाविध कारणे सांगून बाजूला होतात. नवरा, सासू, सासरे, मुले, समाज यांच्याशी संबंधित कारणांमुळे महिलांची उन्नती खंडित झाली आहे. संकटांचा सामना करून ज्या महिला आहे त्या क्षेत्रात टिकून राहतील अशा महिलांची समृद्धी कोणी रोखुच शकत नाही. महिलांसाठी सध्याच्या काळात प्रगती होण्यासाठी विविध संधी उपलब्ध असतांना त्या महिलांनी स्वीकारल्या नाही तर ते मोठे दुर्दैव असेल. आता उठवू सारे रान आता पेटवु सारे रान असा निश्चय करून प्रगतीच्या दिशेने आगेकूच करा असे प्रतिपादन इगतपुरी तालुक्यातील महिलांसाठी सक्रिय कार्य करणाऱ्या उद्योजिका मथुरा जाधव यांनी केले. शाश्वत विकासासाठी कार्यरत असलेल्या सिसडी फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त महिलारत्न सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी उद्योजिका मथुरा जाधव मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. साकुर येथे झालेल्या ह्या कार्यक्रमात बचत गट, आरोग्य, आशा वर्कर, समाजकारण आदी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या छाया रोकडे, सुमन मुसळे, द्वारका धांडे, अलका गायकर, सुरेखा शिरसाठ, सरला सहाणे शांता गाडेकर, सुमन सारूक्ते, मुक्ता सारकुठे, कमल जाधव, सीमा देवगिरे, शोभा मोंढे, कमल आरोटे, विजया जाधव, शिल्पा रोंगटे, मीरा बैरागी, मालन वाकचौरे, मंगला कणसे, सरला बिन्नर, छाया काजळे, राधिका दिवटे, प्रतिभा गाडे यांचा महिलारत्न सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार देऊन मान्यवरांनी सन्मान केला. कार्यक्रमाप्रसंगी इगतपुरी पंचायत समितीच्या माजी उपसभापती जिजाबाई नाठे, घोटी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा गंधास आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी विमा सल्लागार सुरेखा तुपे-गायकर, विधीतज्ञ ॲड. मनिषा वारुंगसे, स्त्रीरोगतज्ञ डॉ. वेदिका गवळी, विमा सल्लागार उर्मिला काजळे, माजी सरपंच कुमुदिनी पागेरे, माजी पंचायत समिती सदस्य वैशाली सहाणे, सामाजिक कार्यकर्त्या पुर्वा मिठारी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिसडी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सीमा श्रीकांत दिवटे, संयोजन समितीच्या शैलेजा मटाले, रुपाली घोडे, अर्चना मोरे, संगिता डांगे, प्रियंका दिवटे, अलका सहाणे, सुमन मुसळे, स्वाती धोंगडे, सोनी फर्नांडो, दुर्गा गोवर्धने, शोभा पाठक, योगिता धनवटे, सविता जमघडे, आशा शिरसाठ, मेघा कडभाने, जयश्री पागेरे, रत्ना जाचक यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रुपाली घोडे, कु. सोनी फर्नांडो यांनी केले तर आभार रुपाली घोडे यांनी मानले. महिलांकडून महिलांनी महिलांच्या सन्मानासाठी साकुर येथे झालेल्या सर्वांगीण कार्यक्रमावेळी बहुसंख्येने महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!