इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
आदिवासी भागातील गरुडेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेला ऊर्जा फाउंडेशनकडून दिलेल्या मदतीचे निश्चित सार्थक होईल असा विश्वास वाटतो. सामाजिक दातृत्व करतांना लोकांची सेवा करायला आम्हाला भाग्य लाभले आहे. आगामी काळात गरुडेश्वर शाळेला गरुडझेप लाभण्यासाठी आवश्यक ते साहाय्य नक्की करू असा शब्द अंधेरी ईस्ट मुंबई येथील ऊर्जा फाउंडेशनच्या नूतन जैन यांनी दिला. इगतपुरी तालुक्यातील गरुडेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेत ऊर्जा फाउंडेशनच्या सौजन्याने बांधण्यात आलेल्या वर्गखोलीचे व स्वयंपाकगृहाचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी सौ. जैन बोलत होत्या. याप्रसंगी राज्य आदर्श शिक्षक शिक्षक प्रमोद परदेशी यांनी आपल्या मनोगतात शाळेतील शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. ऊर्जा फाउंडेशनमुळे विद्यार्थ्यांसह सर्वांना ऊर्जा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार भास्कर सोनवणे यांनी शैक्षणिक कार्यातील योगदानामुळे ऊर्जा ग्रुपच्या सदस्यांची कृतज्ञता व्यक्त केली.
उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वेणूताई श्रीराम बोटे होत्या. मान्यवरांनी सरस्वती पूजन, इशस्तवन केले. विद्यार्थ्यांनी स्वागतगीताने उपस्थित्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते वर्गखोलीचे व स्वयंपाक गृहाचे फित कापून उदघाटन करण्यात आले. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे उपस्थितांची मने जिंकली. ज्ञानेश्वर बांगर, सुरेखा वाघ, कविता गभाले, अशोक पोटकुले, श्रीराम बोटे यांनी मनोगत व्यक्त केले. गावकऱ्यांनी फाउंडेशनच्या सदस्यांचे लेझीम पथक, वारकरी, कलश पथकाद्वारे मिरवणूक काढून स्वागत केले. यावेळी अनेक सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी भाषणे केली. उपस्थित सदस्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून त्याबरोबर
स्कुल बॅग, वॉटर बॉटल, पेन्सिल बॉक्स कंपास- पाऊच, लेखन साहित्य, वह्या वाटप करून विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक देविदास गांगुर्डे, पदवीधर शिक्षक राजेंद्र पवार, पंढरीनाथ कदम, सुरेखा वाघ, ज्ञानेश्वर बांगर, कविता गभाले. ग्रामपंचायत सदस्य सदस्य श्रीराम बोटे, संपत पोटकुले, पोपट लोहकरे, दत्तू पोटकुले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हिरामण वारघडे, अरुण डगळे, अशोक पोटकुले, बाळू गोडे, रमेश गोडे, गजीराम लोटे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक पंढरीनाथ कदम, राजेंद्र पवार यांनी केले. ऊर्जा ग्रुपच्या नूतन जैन, मंजुळा राव, सरिता जालन, अलका जैस्वाल, अनिता जैन, प्रविना जैन, विणा जैन, मधू मल्होत्रा, कामिनी शहा, संपत्ती शहा, तरणजीत कौर, लता जैन, गंगा आंटी, हंसा जैन, मंजू निवेतीया, अजय मल्होत्रा, देवेंद्र अग्रवाल, राजेश तिवारी, प्रीती जालन, जोत्स्ना आंटी, समाप्ती शहा, ममता जैन, मनीषा जैन, निशा गोयल, साशी आंटी, गीता मोदी आदींनी शाळेने केलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले.