आदर्श माध्यमिक कावनई विद्यालयाचा निकाल १०० टक्के ; ज्योती शिंदे विद्यालयात प्रथम : मुलींचा वरचष्मा सिद्ध

किरण रायकर, इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

आदर्श माध्यमिक विद्यालय कावनई विद्यालयाचा शालांत निकाल 100 टक्के लागला आहे. कु. ज्योती मारुती शिंदे ८७ % गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली. व्दितीय सिध्दी माधव शिरसाठ ८५.२० % तर गौरी माधव शिरसाठ हिने ८३.६० % गुण मिळवत विद्यालयात तृतीय स्थान पटकावले. चवथा क्रमांक रेखा संजय बिडवे हिने ७९.४० % गुण प्राप्त करून मिळवला.

कोवीडमुळे प्रत्यक्ष शिकवणी नसतांना सुद्धा विद्यार्थ्यांनी बरीच मेहनत घेत हे यश संपादन केल्याबद्दल ग्रामोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश हिरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी वर्षभर नेटवर्कसाठी बरीच मेहनत घेतली. गुगल मीटवर हजेरी लावत चांगल्या प्रकारे गुण संपादन केल्याबद्दल मुख्याध्यापक बाळासाहेब गांगुर्डे यांनी  विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

शाळा ऑनलाइन असून सुद्धा मुलानी विविध ऑनलाइन स्पर्धात भाग घेवून आपले कर्तृत्व सिद्ध केले. दहावीत सुद्धा नेत्रदिपक असे यश मिळवण्यासाठी शिक्षकांनी अहोरात्र मेहनत घेतली. याबाबत एम. एस. पाटील, आर. पी. पाटील, बी. एस. निकम, एस. डी. हिरे ह्या शिक्षकांचे कौतुक होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!