मातोश्री हॉस्पिटल आणि घोटी ग्रामीण रुग्णालयातर्फे महिलांसाठी कर्करोग निदान व उपचार शिबीर संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८

घोटी येथील मातोश्री हॉस्पिटल आणि घोटी ग्रामीण रुग्णालयातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी कर्करोग निदान आणि उपचार शिबीर संपन्न झाले. इगतपुरी तालुक्यातील महिलांनी ह्या शिबिराचा फायदा घेतला. उपचार आणि निदान याबाबत उपस्थित तज्ज्ञांनी यावेळी महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांचा सन्मान रोजच व्हावा यासाठी रोज महिला दिन आहे असे समजून सर्वांनी काम करावे असे प्रतिपादन डॉ. हेमलता चोरडिया यांनी केले.

गर्भ पिशवीचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरचे निदान यांसह असे गंभीर आजार होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी महिलांना मार्गदर्शन केले, डॉ. अनिता बांगर, डॉ. प्रणिता नाहटा, घोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सदावर्ते, डॉ. राहुल वाघ, डॉ. ज्ञानेश्वर शिरसाठ, डॉ. महेंद्र शिरसाठ, डॉ. जितेंद्र चोरडिया यांनी यावेळी उपस्थित राहून विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
आरोग्यमित्र गौरव परदेशी, एकनाथ शेंडे आणि मातोश्री हॉस्पिटलच्या सहकारी महिलांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

error: Content is protected !!