भिरभिरतेय नजर माझी
सख्या तुला बघण्या
राहवेना एक क्षणही दूर
यावे तुला भेटण्या
स्पर्श तुझा हवाहवासा
अंगी गारवा आणणारा
हातात घेऊनी हात तुझा
जन्मोजन्मी साथ देणारा
काळजाची धडधड
तुझ्या एका भेटीसाठी
दुराव्याला दूर सारून
प्रेमबंधात जन्मोजन्मीसाठी
गुंतलाय जीव तुझ्यातच
बेभान होई माझेही मन
ओढ तुला भेटावयाची
जवळीक नसतोस् तू पण
तुझी एक झलक बघताच
नजरेलाही मिळे विसावा
बहरलेली प्रीत माझी जणू
नुसतच नव्हे दिखावा
कवयित्री : कु. सोनाली कोसे, डोंगरगाव, जि. चंद्रपूर