भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंती महोत्सव अध्यक्षपदी उमेश सोनवणे

इगतपुरीनामा न्यूज, दि. 2 ( ज्ञानेश्वर महाले )
त्र्यंबकेश्वर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी उमेश सोनवणे तर उपाध्यक्षपदी आदित्य भालेराव यांच्या निवड करण्यात झाली आहे. त्र्यंबकेश्वर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.अध्यक्ष म्हणून उमेश सोनवणे, उपाध्यक्ष आदित्य भालेराव, खजिनदार मोहन सोनवणे, सहखजिनदार तेजस सोनवणे, सरचिटणीस सुभाष शांताराम सोनवणे, सहचिटणीस रमेश दोंदे, कार्याध्यक्ष मिलिंद तिवडे, सहकार्याध्यक्ष आकाश सोनवणे, सल्लागार भाऊराव सिताराम सोनवणे, शांताराम बागूल, रविंद्र सोनवणे, दिलीप सोनवणे, रत्नाकर खाटीकडे, अविनाश चंद्रमोरे, विजय गांगुर्डे, संजय सोनवणे, बौद्धाचार्य सुभाष हरी सोनवणे, सदस्यपदी ऋतिक सोनवणे, प्रकाश दोंदे, करन ढेंगळे, अविनाश जाधव, बबलू काकवीपूरे, रोशन खैरनार, सौरभ खाटिकडे, हर्षद सोनवणे, साहिल शहा, पवन भालेराव, कुणाल सोनवणे ,प्रशांत सोनवणे, अजय दोंदे आदींची निवड करण्यात आली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समाज घडविण्यासाठी यंदा मोठ्या प्रमाणात आँनलाइन स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इ. १ ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रात रक्ताची कमतरता भासत असल्याने जयंती निमित्त रक्तदान शिबीर व कोरोना योद्धा सन्मान आयोजन करण्यात येणार आहे.

उमेश सोनवणे

Similar Posts

Comments

  1. avatar
    उमेश सोनवणे,त्र्यंबकेश्वर says:

    मनपूर्वक धन्यवाद…👏

Leave a Reply

error: Content is protected !!