
इगतपुरीनामा न्यूज, दि. २
सर्वत्र कोरोनाचा भयानक उद्रेक सुरू असतांना आपला जीव धोक्यात घालून अविरत सेवा देणाऱ्या आरोग्य विभागातील कोरोना योद्धयांचा सन्मान करण्यात आला. लोकांच्या जीवनाचा रंग उजळण्यासाठी झपाटलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा हा सन्मान रंगपंचमीच्या पर्वावर करण्यात आला. घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रसिद्ध गिर्यारोहक भगीरथ मराडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आज संपन्न झाला. तालुक्यातील कोरपगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कृतज्ञता व्यक्त करणारी अनोखी रंगपंचमी संपन्न झाली.
इगतपुरी तालुक्यात कोविड सेंटर उभारावे अशी मागणी गेल्या आठवड्यात भगीरथ मराडे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह केली होती. ह्या मागणीला यश आल्याने यावेळी कोरोना योद्धांचा सत्कार करून रंगपंचमी साजरी करण्यात आली.
गेल्या महिन्यापासून कोविडची महामारी पुन्हा झपाट्याने वाढू लागल्याने इगतपुरी तालुक्यात लवकरच कोविड सेंटर सुरू करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले होते. मागणीची दखल घेण्यात आल्याने राजसैनिकांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हाभर कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन इगतपुरी तालुक्यात पण त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे. त्यामुळे बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा प्रशासनाने कोरपगाव येथे अतितातडीने सुरू केले आहे. त्यामुळे मनसेच्या मागणीला यश आले. यावेळी राजसैनिकांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांचे आभार मानले. स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरपगाव कोविड सेंटर मध्ये २४ तास अनेकजण तत्पर आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, डॉ. अक्षय मागडे, डॉ. अश्विनी सानप, नर्स प्रीती खुताडे, अजित गुरव, नितीन नेतावडे यांसह इतर नर्स, सफाई कर्मचारी, रुग्णवाहिका चालक ह्या कोरोना योद्धयाना रंगपंचमी निमित्ताने रंगाचा टिळा लावण्यात आला. शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून आगळीवेगळी रंगपंचमी साजरी केली. ह्याप्रसंगी मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे, सरपंच रामदास आडोळे, जिल्हा सचिव अभिजित कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते, तालुकाध्यक्ष कृष्णा भगत, उपतालुकाध्यक्ष संजय सहाणे, हरदीप चौधरी, संतोष कडवे, माजी सरपंच कैलास भगत, हरिष चव्हाण, कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक बाळू आरोटे, प्रवीण भटाटे, अशोक हेमके, निलेश पवार आदी राजसैनिक उपस्थित होते.
